पिंपरी निर्मळ येथे मुख्याध्यापक शेख महेबूब आब्बास यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभ

लोकसागर न्यूज –

पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि.अहिल्यानगर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. शेख महेबूब अब्बास हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाचे चेअरमन रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील हे भूषविणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था, सातारा, उत्तर विभाग अहिल्यानगरचे विभागीय अधिकारी बोडखे एन. एस. आणि सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य बाबासाहेब दादा पा. निर्मळ, पर्यवेक्षिका मनिषा पिलगर, स्थानिक स्कूल कमिटी, सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व सेवकवृंद, विद्यार्थी वर्ग आणि पिंपरी निर्मळ गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

तरी या कृतज्ञता सोहळ्यास सर्व माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed