जासई – उरण ( लोकसागर डिजिटल वृत्तसेवा ) स्वच्छता हि सेवा अंतर्गत जासई येथे जे. एस. एस. रायगडद्वारा स्वच्छता जनजागृती रॅली व कापडी पिशवी वितरण—-जासई – केंद्र व राज्य सरकारच्या विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्य विषयक जन जागृती, कौशल्य विकास उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जन शिक्षण संस्थान रायगडच्या वातीे गुरुवार दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी येथे कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने पिशवी वितरण व स्वच्छता उपक्रम आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ. रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जे. एस. एस. रायगड च्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ. विजय कोकणे यांनी दिली.

भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील २१ वर्ष पासून सक्रियपणे सुरु असून आता पर्यंत ८० हजाराहून अधिक लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून “जासई – उरण” ह्या ठिकाणी “कापडी पिशवी वाटप व स्वछता उपक्रम” घेण्यात आले. या उपक्रमाप्रसंगी कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे, प्रशिक्षिका सुलोचना घरत व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed