पुणे : पारंपारिक भारतीय मार्शल आर्ट असलेल्या सिलंबम खेळाची २३ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. “Tradition is not passion, its our life style” या ब्रीदवाक्यासह ही स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेला सिलंबम कलाइथाई स्पोर्ट्स फेडरेशन (SKTSF), कलाइथाई सिलंबम फेडरेशन ऑफ एशिया आणि कलाइथाई वर्ल्ड सिलंबम फेडरेशन यांची संलग्नता लाभली आहे. तर ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा सिलंबम असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा होत असून, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) ने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट्स चे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू आपला सहभाग नोंदवणार आहेत. यामध्ये नवी मुंबईतील उलव्याच्या वॉरियर्स क्लबच्या खेळाडूंनी देखील दमदार सहभाग नोंदवला असून, ते आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.सिलंबम हा केवळ खेळ नसून तो आपला पारंपारिक वारसा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या प्राचीन युद्धकलेला प्रोत्साहन मिळणार असून, उलव्याच्या वॉरियर्स क्लबच्या खेळाडूंकडून राज्यस्तरावर चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed