नाशिक – पारंपारिक मर्दानी युद्ध कलेचे शौर्य, पराक्रम आणि कौशल्य संवर्धित करण्यासाठी अमॅच्युअर मर्दानी युद्धकला असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित पहिल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मर्दानी युद्ध कला चॅम्पियनशिप २०२६ मध्ये नवी मुंबईतील उलवे येथील वॉरियर्स क्लबने घवघवीत यश संपादन केले आहे.

नाशिक येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात पार पडलेल्या या स्पर्धेत वॉरियर्स क्लबच्या तीन खेळाडूंनी सहा पदके पटकावली. यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.

पदक विजेते खेळाडू असे –

१. २० वर्षांखालील मुली गट –
कु. सावली पोपळे हिने दांडपट्टा प्रकारात सुवर्णपदक तर तलवारबाजी प्रकारात रौप्यपदक पटकावले.

२. १३ वर्षांखालील मुले गट –
आर्यन सिंग राजपूत याने भाला चालविणे प्रकारात सुवर्णपदक तर लाठी-काठी प्रकारात कांस्यपदक मिळवले.

३. १२ वर्षांखालील मुले गट –
देवेश मांजरेकर याने दांडपट्टा प्रकारात रौप्यपदक तर लाठी-काठी प्रकारात कांस्यपदक जिंकले.

वॉरियर्स क्लबच्या या यशस्वी खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक ओमकार सागर रंधवे आणि सहप्रशिक्षिका कु. ऋतुजा सागर रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed