मुंबई : सांताक्रुझ येथील पोलीस वसाहतीमध्ये देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात वॉरियर्स क्लब, नवी मुंबईचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविणे आदी शिवकालीन मर्दानी खेळांचे मुख्य प्रशिक्षक ओमकार वैशाली सागर रंधवे यांचा मुंबई परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग (IPS) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी वॉरियर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय विश्वविक्रमाचाही गौरव करण्यात आला. यावर्षी वॉरियर्स क्लबच्या ८२ विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे दुहेरी लाठी-काठी चालविण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या विश्वविक्रमवीरांपैकी सांताक्रुझ युनिटमधील ११ प्रशिक्षणार्थींचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.शिवकालीन मर्दानी खेळांच्या माध्यमातून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी वॉरियर्स क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, प्रशिक्षणार्थींचे पालक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed